Peoples Media Pune header

Go Back

प.पू.श्री .सुधांशुजी महाराज यांचा २१ ते २३ मार्च २०२४ विराट भक्ती सत्संग.

18 Mar 2024
पुणे (दि.१८) विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने प.पू. सुधांशुजी महाराज यांच्या विराट भक्ती सत्संगचे आयोजन केले आहे. गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ७ असा भक्ती सत्संग होईल. शुक्रवार दि २२ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ व संध्याकाळी ५ ते ७ असा भक्ती सत्संग. शनिवार दि.२३मार्च २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ भक्ती सत्संग, दुपारी १२ वाजता मंत्रदीक्षा व संध्याकाळी ५ ते ७ भक्ती सत्संग असेल. कार्यक्रम स्थळ थोपटे बॅंक्वेटस, गोडांबे चौक, रामनगर रहाटणी, मेट्रो हॉस्पिटल जवळपुणे १७. भारतीय संस्कृतीत गुरु उपदेश – सत्संग प्रवचन यांचे खूप महत्व आहे, यात फक्त आध्यात्मिकच नव्हे तर जीवन विषयक मार्गदर्शन मिळते. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला असून नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह या कार्यक्रमात सहभागी होवून गुरुमार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे विश्व जागृती मिशनचे पुणे मंडल अध्यक्ष घनश्याम झंवर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.या प्रसंगी विष्णू भगवान अग्रवाल(महामंत्री), गणेश कामठे (उपाध्यक्ष) उपस्थित होते. छायाचित्र : प.पू.सुधांशुजी महाराज.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite