Peoples Media Pune header

Go Back

रोटरी लोकमान्यनगरच्या वतीने १५० दिव्यांग(अंध) नागरिकांना १ महिन्याचा किराणा वाटप.

09 Nov 2020

कोरोना महामारीमुळे सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा या साठी रोटरी क्लब लोकमान्यनगर व रोटरी क्लब प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कॅफे दुर्गाच्या सहकार्याने नवोदय दिव्यांग संस्था निगडीच्या १५० दिव्यांग(अंध)नागरिकांना महिनाभर पुरेल एव्हडे किराणा समान प्रदान करण्यात आले. यात तांदूळ,डाळ,आटा तेल व आणि बाबींचा समावेश आहे.प्रबोधनकार ठाकरे सभागृह निगडी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब लोकमान्यनगरचे अध्यक्ष रो.आनंद माहूरकर,रोटरी प्राधिकरणच्या अध्यक्ष आदिती जोशी,कॅफे दुर्गाचे संचालक कपिल अनिल कुलकर्णी,नवोदय दिव्यांग संस्थेचे संस्थापक सिद्धेश्वर जोगदंड,रोटरी सर्व्हिस डायरेक्टर महेश घोरपडे,डिस्ट्रिक्ट ऑफिसर  रो.टीना रात्रा  आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :मदत वाटप करताना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite