Peoples Media Pune header

Go Back

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोच्या वतीने डॉक्टर्स दिनानिमित्त पिपीई किटस प्रदान.

01 Jul 2020

डॉक्टर्स दिना निमित्त पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्या वतीने पुना हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना ५० पिपीई किट प्रदान करण्यात आले.संस्थेच्या यादव भवन येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष शरद सूर्यवंशी,माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे,उपाध्यक्ष विलास आहेरकर,स्पोर्ट्स कमिटीचे उमेश दांगट,माजी उपाध्यक्ष मनोज चितळीकर,अनिरुद्ध चव्हाण,विनोद रहाटे,प्रणव शेठ,स्वप्नील शहा,पुना हॉस्पिटलचे डॉ.हिमांशु खारकर(व्यवस्थापक),श्री.नरेश दवे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलतांना शरद सूर्यवंशी व नरेंद्र सोनवणे यांनी या करोना महामारीच्या काळात डॉक्टर्स मोलाची कामगिरी बजावत आहेत त्यांचा डॉक्टर्स दिनानिमित्त सत्कार महत्वाचा आहे असे संगितले. डॉ.हिमांशु शहा यांनी मास्कचा नेहमी वापर महत्वाचा असून त्याने बराच बचाव होतो असे संगितले. 

छायाचित्र :संस्थेचे मान्यवर व डॉक्टर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite