Peoples Media Pune header

Go Back

महामेट्रो कडून आरे दूध डेअरी येथे परवानगी व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात वृक्षांची बेकायदा तोड व गाडने.

14 Feb 2020

महामेट्रो साठी सरकारने मुंबई पुणे रस्त्यावरील आरे दूध प्रकल्पाची जागा कराराने  दिली आहे.येथे एसटी स्टँड साठी या जागेत नदी किनारी असलेल्या ग्रीन बेल्ट-नदी पात्र येथे असलेले जुने वृक्ष महामेट्रो कडून मोठ्या प्रमाणात तोडले जात आहेत.संस्थेने वारंवार निदर्शनास आणून,पत्र व्यवहार करूनही परवानगी व्यतिरिक्त जास्त वृक्षतोड सुरू आहे.तसेच जेसीबीच्या सहायाने झाडे गाडली जात आहे.झाडे लावा झाडे जगवा असे शासकीय धोरण असतांना ही सुरू आहे.तक्रारदार गणेश चव्हाण(पुणे जिल्हा अध्यक्ष विश्व मानवाधिकार परिषद) पुणे मनपा आयुक्त यांनाही वारंवार बोलणी व पत्रव्यवहार केला आहे.उद्यान अधीक्षक घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय,माहिती अधिकार पुणे जिल्हाधिकारी.आम्ही हीबाब विचारली असता आरे डेअरी कर्मचारी बनसोडे यांनी माझे विरोधात खडकी पोलिस स्टेशन येथे सरकारी कामात व्यत्यय आणल्याचे संगितले.आम्हाला पोलिसांनी समाज दिली.येथील बेकायदेशीर जादा वृक्षतोड थांबवावी.अशी मी मागणी करीत आहे.योग्य ती कारवाई न झाल्यास मी घटनास्थळी बसेन असा इशारा संबंधितांना देत आहे.

छायाचित्र :संबंधित स्थळाचे छायाचित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite