Peoples Media Pune header

Go Back

श्रीरंग गोखले लिखित”कल्पकतेचे दिवस”.पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा पुरस्कार प्रदान.

07 Dec 2019

श्रीरंग गोखले लिखित “कल्पकतेचे दिवस” या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा “गौरव पुरस्कार डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोडच्या सभागृहात झालेल्या या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ.गो.बं.देगलूरकर,उपाध्यक्ष डॉ.पुष्पा लिमये,कार्यवाह डॉ.अ.नी.नवरे,सहकार्यवाह डॉ.अ.श्री.चाफेकर आदि मान्यवरांच्या बरोबरच साहित्य क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना श्रीरंग गोखले यांनी हे डिझाईन,उद्योजक,नवउद्योजक,व ज्यांना ज्ञान मिळवून त्यांच्या व्यक्तिमत्वात भर घालावी या हेतूने लिहिले आहे असे नमूद केले.

छायाचित्र :डॉरघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारतांना श्रीरंग गोखले  व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite