Peoples Media Pune header

Go Back

स्टार्ट अप मास्टर क्लास कार्यशाळा संपन्न.

29 Sep 2019

अल्युमिनि असोसिएशन आयआयटी कानपूर तर्फे घेण्यात आलेल्या स्टार्ट अप मास्टर क्लासच्या १९ व्या कार्यशाळेचे उद्घाटन परिवहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संदेशाने झाली.सदरील कार्यशाळेसाठी संपूर्ण भारतातून ४०० उद्योजक आणि स्टार्ट अप कंपन्यांचे मालक उपस्थित होते. सदरील कार्यशाळेत स्टार्ट अप कंपन्यांना आयडिया- कल्पना पासून ते मोठ्या उद्योगा मध्ये कसे यशस्वी व्हावे.त्यासाठी पैसे कसे उभारावे,भागीदार कसे शोधावे,टिम कशी तयार करावी आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या आव्हानांना कसे सामोरे जावे यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. नितिन गडकरी यांनी स्टार्ट अप कम्युनिटीला त्यांच्या प्रवासात भरभरून शुभेच्छा दिल्या.आणि देशाच्या जडणघडणीत सर्वांनी खरीचा वाटा उचलावा असा सल्ला दिला. तसेच अटल इनक्यूबेशन सेंटरचा लाभ घ्यावा आणि भारतातील आयडिया-कल्पना दुसर्‍या देशात जावून मोठ्या होतात तर त्या इथेच मोठ्या व्हाव्यात आणि देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी धिरज ओस्तवाल(स्टार्ट अप पुणे),प्रदीप भार्गवा(आयआयटी कानपुर),शैलेन्द्र आगरवाल(आयआयटी कानपूर),संजय गालांडे(आयसर),रोहित कोशी(आयआयटी दिल्ली)आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :ई दीप प्रज्वलन करताना डावीकडून धिरज ओस्तवाल,प्रदीप भार्गवा,शैलेन्द्र आगरवाल,संजय गालांडे,रोहित कोशी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite