Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे आ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन.

04 Sep 2019

रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे उद्घाटन मा.आ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. टँकर पॉइंट एरंडवणे येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आ.मेघाताई कुलकर्णी,नगरसेवक जयंत भावे.रोटरी क्लब युवाचे अध्यक्ष रो.राहुल गडकरी,सेक्रेटरी रो.तृप्ती नानल,उपाध्यक्ष रो.निनाद जोग,मनोज धारप,गणेश खिरीड(वरिष्ठ आरोग्य निरीक्षक)आदि मान्यवर व रोटरी युवा सदस्य उपस्थित होते.या प्रकल्पाची क्षमतातासाला दोन टन आहे.यासाठी १०० हून अधिक मंडळांशी संपर्क केला आसून तेथील निर्माल्य संकलन,श्रेडिंग करून याचे खत तयार करण्यात येईल आणि ते गरजू शेतकर्यांना मोफत देण्यात येईल.उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून याला प्रतिसाद वाढत आहे असे राहुल गडकरी यांनी नमूद केले.  

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मेघाताई कुलकर्णी,जयंत भावे,राहुल गडकरी,तृप्ती नानल व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite