Peoples Media Pune header

Go Back

डॉ.दीपक शिकारपूर लिखित “सोशल मिडिया शाप की वरदान”,पुस्तकाचे प्रकाशन

07 Jun 2019

ज्येष्ठसंगणक तज्ञ डॉ.दीपक शिकारपूर लिखित “सोशल मिडिया शाप की वरदान” या ३९ व्या पुस्तकाचे प्रकाशन काल संध्याकाळी ६.१५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले.या प्रसंगी आदरणीय दादा इदाते(विमुक्त जनजाती परिषदेचे अध्यक्ष),थोर कलाकार पद्मश्री मनोज जोशी.ले.जन डॉ कोचर(टेलिकॉम सेक्टर स्किलचे राष्ट्रीय अध्यक्ष)व संजय गांधी अस्पायर स्किलचे संचालक उपस्थित होते. विश्वकर्मा प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे.या प्रसंगी श्री इदाते म्हणाले “सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार,मते,माहिती पोचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे.पण या माध्यमाचा गैरवापरही होताना आढळून येत आहे. त्याचा संयमित व नियंत्रित आणि व्यापक सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून वापर केला जाणे ही खूप आवश्यक बाब आहे.लेखक श्री शिकारपूर म्हणाले “.सोशल नेटवर्किंग हा इंटरनेटच्या महाजालातील परवलीचा शब्द आहे. सोशल मीडियावर असणे आत्ताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे.तिथे नसणे काळाबरोबर नसल्याचे लक्षण मानल जाते. आपले दैनंदिन आयुष्य सोशल मीडियावर प्रकाशित करणे हा काहींचा छंद झाला आहे.अनेकांना इ व्यसनाधीन बनवायचे काम त्यामुळे होत आहे. -

छायाचित्र :डावीकडून संजय गांधी,कोच्चर,मनोज जोशी,दीपक शिकारपुर दादा इदाते

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite