“उद्योजकता ही मानसिकता आहे.सर्वप्रथम मानसिकता बदलली पाहिजे.मग व्यवसायात यशमिळते.आपण स्वता:च्या क्षमता कमी समजतो हा न्युनगंड दूर केला पाहिजे व आत्मविश्वासाने,जिद्दीने चिकाटीने उद्योग व्यवसाय करावा.मोठी स्वप्ने वा ध्येय यांचा पाठपुरावा करण्यास मागेपुढे पाहू नये” असे प्रतिपादन तज्ञ व्याख्याते व समुपदेशक डॉ.आशीष तवकर यांनी केले. ते मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स &इंडस्ट्रीज येथे मार्गदर्शन करत होते.वायसीएम हॉल येथे झालेल्या या व्याख्यान प्रसंगी मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स &इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निसार सागर,सचिव रिझवान शेख,उपाध्यक्ष निसार सय्यद,संस्थापक रोस मसुद शेख आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना निसार सागर यांनी आगामी काळात उद्योजकता वाढणे व त्यामुळे समाजाची आर्थिक,सामाजिक उन्नती होणे यासाठी मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स &इंडस्ट्रीज कार्यरत राहील असे संगितले.
छायाचित्र :व्यवसाय मार्गदर्शन करताना डॉ.आशीष तवकर,निसार सागर,रोस मसूद शेख व रिझवान शेख
© 2011. Peoples Media Pune