प्रसिद्ध ब्लोगर व लेखिका शेफाली वाद्य यांचे सुजाण पालकत्वावर आधारित “घार हिंडते आकाशी”,या पुस्तकाचे प्रकाशन इतिहास संशोधक डॉ.जी बी.देगलूरकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खा.अनिल शिरोळे व संगीतकार कौशल इनामदार होते.सुमंत मुळगावकर हॉल.सेनापती बापट रोड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उषा वैद्य(लेखीकेंच्या मातोश्री),मुग्धा कोपर्डीकर(इंद्रायणी साहित्य),इंडिक अकादमीचे शैलेन्द्र मराठे,पदाधिकारी,विविध क्षेत्रांतील मान्यवर,नागरिक व कुटुंबीय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना लेखिका शेफाली वैद्य यांनी तिळ्या मुलांचा सांभाळ करताना आलेले अनुभव,भावना व पालकत्व याविषयी असलेले हे पुस्तक प्रचारी नसून एक मुक्त चिंतन आहे असे सांगितले.अनिल शिरोळे यांनी बोलताना मातृत्व व संगोपन ही अत्यंत अवघड बाब आहे.बालवयातील संस्कारांवरच जीवनाला दिशा मिळते असे सांगितले.डॉ.जी.बी देगलूरकर यांनी बोलताना मातृत्व हा आनंदच नव्हे तर ती एक जबाबदारी आहे.असे प्रतिपादन केले.इंद्रायणी साहित्य प्रकाशित या पुस्तकाची पृष्ठ संख्या १४८ असून किंमत १७० रु आहे.या पुस्तकाचे मानधन रक्कम भारत के विर फंडास देण्याचे लेखिका शेफाली वैद्य व प्रकाशक मुग्धा कोपर्डीकर यांनी जाहीर केले.
छायाचित्र :डावीकडून उषा वैद्य,शेफाली वैद्य,कौशल इनामदार,जी.बी.देगलूरकर,अनिल शिरोळे,मुग्धा कोपर्डीकर
© 2011. Peoples Media Pune