Peoples Media Pune header

Go Back

सेवाकलश संस्थेची घराचे घरपण हरवलेल्या मुलींची दीपावली.

13 Nov 2018

सेवाकलश संस्थेतर्फे न्यू व्हिजन होम पुणे या आश्रमशाळेतील मुलींना नवीन कपडे शिवून देण्यात आले.तसेच दीपावली निमित्त केक,खाऊ आदींचे देखील वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम संस्थेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा.नयन लोखंडे व संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज पवार यांच्या कल्पनेतून आयोजित करण्यात आला.याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विजय तिकोणे यांनी ज्या मनपाच्या शाळेत आपण शिकलो ती शाळा बंद झाल्याची खंत व्यक्त करून त्याच ठिकाणी सुरु झालेल्या आश्रमशाळेत या निरागस बालीकां सोबत दीपावली साजरी करणे हे केवळ त्यावेळी शिक्षकांनी दिलेले संस्कार आहेत असे सांगितले.या प्रसंगी संस्थाचालक प्रतिभा सरवदे उपस्थितांचे आभार मानले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोमल साळुंखे, वैष्णवी वर्तुले,आलीया शेख,नम्रता उंडे,अश्विनी चव्हाण आदींनी परिश्रम केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite