Peoples Media Pune header

Go Back

विर मित्रमंडळाच्या लहान सदस्यांनी बनविला महिमान गड किल्ला प्रतिकृती

06 Nov 2018

कसबे पुणे म्हणजे मूळ पुणे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व्यतीत झाले.तिथल्या विर मित्र मंडळाच्या लहान सदस्यांनी किल्ले महिमान गडाची प्रतिकृती तयार केली.यात किल्ल्याचे विविध विभाग,तटबंदी,देऊळ,दरवाजा,पाणी टाके,पायवाट आणि पाय-र्या  इत्यादींचा समावेश आहे.व १० फुट लांबी ४ फुट रुंदी आणि ३ फुट उंची अशी प्रशस्त प्रतिकृती आहे.यात वेदांत चव्हाण,सार्थक जराड ओम साठे,ऋतिक साठे,विनायक घोडखिंडी,हरी जराड,गजानन महाडिक निलेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.लहान मुले म्हणजेच नव्या पिढीला इतिहासाची माहिती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे हरीश जराड यांनी नमूद केले.

छायाचित्र :किल्ला प्रतिकृती तयार करताना बालचमू 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite