Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ रॉयलच्या अध्यक्षपदी गिरीश देशपांडे

18 Jul 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी रो.गिरीश देशपांडे यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष रो.विशाल गुंजाळ यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी.रो.अस्मिता वैद्य यांनी निवड करण्यात आली.त्यांनी अजय चौधरी यांच्याकडून सूत्रे स्विकारली.अँब्रेशिया रिसोर्ट बावधन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे,माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपूर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,रोटरी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचीत अध्यक्ष गिरीश देशपांडे यांनी आगामी काळात गणेशोत्सवात पोलिसांसाठी तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम.वृद्धाश्रम मदत,नळपाणी गळती रोखणे,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,महिलांना कँन्सर प्रतिबंधक लस,अवयव दान मोहीम व अन्य प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite