Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी श्रीकांत जोशी

14 Jul 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या अध्यक्षपदी रो.श्रीकांत जोशी यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष अजय कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी गोपाल निर्मल यांची निवड करण्यात आली.त्यांनी मनोज धारप यांच्याकडून सूत्रे स्विकारली.निर्मलबाग सभागृह येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.रवी धोत्रे,माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,रोटरी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचीत अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी आगामी काळात गणेशोत्सवात निर्माल्य संकलन,महिला सशक्तीकरण,वैद्यकीय,शैक्षणिक व अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite