धायरी येथे आशीर्वाद वृद्धाश्रम चालविणारे विकास देडगे यांना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने “श्रावणबाळ”पुरस्कार संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळेपाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.अंबर हॉल,कर्वेरोड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भीमराव मराठे(प्रदेशाध्यक्ष),विजयकुमार घाडगे पाटील(प्रदेशाध्यक्ष वि.आ)प्रतापसिंह कांचन पाटील(अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र),जगदीश जाधव(कोकण व मुंबई संपर्क प्रमुख),अनिलभाऊ पाटील(उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र),राजाभाऊ पवार(अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ग्रा.आ.),शरद कुंभार(पुणे जि.अध्यक्ष युवा आघाडी),आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नानासाहेब जावळे पाटील यांनी समाजातील विविध कर्तुत्ववान व सेवा करणा-या लोकांचा सन्मान करणे आवश्यक आहे,यामुळे सामाजिक प्रगतीस हातभार लागतो असे सांगितले. असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना विकास देडगे यांनी कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.
छायाचित्र:विकास देडगे यांना पुरस्कार प्रदान करताना नानासाहेब जावळे पाटील व अन्य मान्यवर
© 2011. Peoples Media Pune