Peoples Media Pune header

Go Back

एकाचवेळी भारतात व जगभरात भगवान पार्श्वनाथमूर्ती अभिषेक संपन्न

11 May 2018

सिद्धांत महोदधि सूरी प्रेम यांच्या ५० व्या स्वर्गरोहन(अर्धशताब्दी)दिना निमित्त आज सकाळी संपूर्ण भारतातील व जगभरातील १३०० जैन मंदिरांत भगवान पार्श्वनाथ मूर्तीवर एकाचवेळी अभिषेक करण्यात आला.या अंतर्गत पुण्यातील प्राचीन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिरात भगवान पार्श्वनाथ मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.देशातील पुणे,सुरत,मुंबई,दिल्ली,चेन्नई,इंदोर, विजयवाडा,पिंडवाडा याठिकाणचे अभिषेक इन्टरनेटद्वारे लाइव्ह प्रक्षेपित केले गेले.पुण्यातील अभिषेक प्रसंगी राजूभाई शहा,धीरूभाई शहा,चिराग दोशी,शशिकांत मणियार,आदी मान्यवरांच्या बरोबरच जैन अॅलर्ट ग्रुपचे सदस्य व भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे भगवान पार्श्वनाथ मूर्तीवर अभिषेक करताना भाविक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite