Peoples Media Pune header

Go Back

पीएमपीएमएल संबंधी विविध प्रश्नांवर आ.डॉ.नीलमताई गो-हे यांची नयना गुंडे यांच्याशी चर्चा.महिला सुरक्षेसाठी घेणार जनता दरबार

11 May 2018

सुवर्णा पवार या महिलेसोबत प्रवासात झालेले गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांची स्वारगेट येथील मुख्यालयात भेट घेतली.यावेळी अनेक विषय मांडले व सूचना केल्या.यात सुवर्णा पवार प्रकरणातील पीएमपीएमएलच्या तक्रार मागे घ्यावी कारण कर्मचारी वैयक्तिक तक्रार करू शकत नाही संस्थेने करावी असा नियम आहे.कर्मचारी वर्गासाठी योग्य नियम व वर्तणुकीचे प्रशिक्षण आयोजित करणे,बसमध्ये सीसीटीव्ही बसवावेत,म्हणजे गैरप्रकारांना आळा बसेल यासाठी आमदार निधीतून ५० बसेससाठी १० लाख रुपये देण्याचे मान्य केले.व अन्य लोकप्रतिनिधीनी सुद्धा यासाठी निधी द्यावा असे सुचवले.महिला स्वच्छतागृहांची कमतरता लक्षात घेता बीओटी तत्वावर बनवावीत असे सुचवले,जे कर्मचारी चांगले काम करतात त्यांचा सत्कार करावा. पीएमपीएमएलच्या अॅपचा प्रसार करावा.व काही जनजागृती साहित्य स्री आधार केंद्रातर्फे पुरविण्याची तयारी दर्शविली.नयना गुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देतसकारात्मक प्रतिसाद देत महिला सुरक्षेसाठी पुणे व पिंपरीचिंचवड येथे जनता दरबार व अन्य  बाबी अमलात आणण्याचे मान्य केले.या शिष्टमंडळात अशोक हरणावळ,राजेंद्र शिंदे,संगीताताई ठोसर,सविता मते,संजय भोसले,आनंद गोयल,पल्लवी जावळे,संजय वाल्हेकर,सचिन खांदवे,शेलार गुरुजी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

छायाचित्र;नीलमताई गो-हे व पदाधिकारी नयना गुंडे यांना निवेदन देताना  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite