Peoples Media Pune header

Go Back

डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी ७५ वे रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.

20 Mar 2024
पुणे (दि.१९) व्यावसायिक कार्य करत असतांना सामाजिक कार्यात ही सहभागी होणारे डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी त्यांचा वाढदिवस ७५ वे रक्तदान करून साजरा केला. या बद्दल त्यांचा सत्कार निकमार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अनिल कश्यप व डॉ.गणेश राव यांच्या हस्ते करण्यात आला. पीवायसी जिमखाना डेक्कन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्नो ग्लोबल कम्युनिटीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी रक्तदान केले की काही नुकसान होत नाही, नवे रक्त तयार होते, व रक्तदाना मुळे अनेक रुग्णांचा जीव वाचतो. सर्वांनी अवश्य रक्तदान करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मीनल गुर्जर व आरती मालपाणी यांनी केले. छायाचित्र :डावीकडून आयएसएएस रक्तपेढी सदस्य,डॉ.दीपक तोष्णीवाल,डॉ.अनिल कश्यप,डॉ.गणेश राव.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite