Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी निखिल टकले.

03 Aug 2022

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी निखिल टकले यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळते अध्यक्ष असित शहा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी श्रीकांत मडघे  यांची निवड करण्यात आली. न्यू इंग्लिशस्कूल टिळक रस्ताच्या गणेश सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल मंजु फडके,खजिनदार सारिका रोडे,रोटरी युथ एक्स्चेंज डायरेक्टर शोभा नहार,संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष निखिल टकले यांनी आगामी काळात वृक्षारोपण,रक्तदान,विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.  

छायाचित्र : निखिल टकले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite