Just Demand.info : The Premium Business Directory | Peoples Media Pune - Mr. Rajendra Sonar- 9822506873
पुणे (दि.८) सुविधा आयुर्वेद संशोधन संस्थेचे संस्थापक व आयुर्वेद संशोधक डॉ. शिरीष शेपाळ यांच्या तर्फे ७००० गायनाचे कार्यक्रम पूर्ण करणारे गायक कमलाकर तपस्वी यांना ‘गान महर्षी’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Click Read More to see this news in detail.
स्वयंपाकाचा गॅस ही सर्वसामान्यांची जीवनावश्यक बाब आहे. सरकार यावर काही सबसिडीसुद्धा देते. मात्र निदर्शनास असे आले आहे कि याचा फायदा गॅस माफियाच लाटतात. श्री राजेंद्र सोनार यांनी काही दिवसापूर्वी मागणी नोंदून देखील गॅस न आल्याने शिवाजी नगर कोर्टाच्या समोरील पासलकर अॅन्ड सन्स गॅस एजन्सीत जाऊन चौकशी केली (Ph 02025534250) त्यावेळी त्यांना तेथील कर्मचारी बाळासहेब जाधव यांनी आम्ही कंपनीकडे ९०० सिलेंडर मागितले असता फक्त ३००च मिळतात असे उत्तर दिले. सोनार यांनी बाहेर गाडी उभी असल्याचे व आपण पत्रकार असल्याचेही सांगितले यावर ती गाडी रिकामी असल्याचे संगितले गेले.
पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सेनेच्या पुण्यातील काही जागा कमी झाल्याचा अर्थ अनेकांनी शिवसेना संपली असा घेतला. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेची मते फक्त ०.८७% कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुलनेत अपक्ष व कॉंग्रेसला मोठा फटका बसलेला दिसतो. ही आकडेवारी श्री. शिरीष फडतरे यांनी जमा केली असून त्याचा आलेख सुद्धा www.peoplesmediapune.com या संकेत स्थळावर दर्शवण्यात आला आहे.
दिलीपराज प्रकाशनचे १९९९ वे पुस्तक (साहित्य लोक, ग्रामिण आणि दलीत), २००० वे पुस्तक (स्वातंत्र्य योद्धा - मार्टिन ल्युथर किंग) आणि २००१ वे पुस्तक ( दिल्याघरची मराठी ) यांचे प्रकाशन आणि पुणे शहरातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक प्रेस व प्रेसच्या इमारतीचे उदघाटन विरोधी पक्षनेते मा. विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून माजी गृहराज्यमंत्री मा.गजानन किर्तीकर, मा. आ. गिरीष बापट, मा. आ. भीमराव तापकीर आणि धायरीचे सरपंच मा.मदन भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. २००० व्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक मा.द.मा. मिरासदार यांच्या हस्ते होणार असून प्रा.मिलींद जोशी या पुस्तकांवर आपले विचार मांडणार आहेत.
आयुष चिकित्सक महासंम्मेलन २०१
ONE DAY C.M.E. PROGRAMME ON CRITICAL ILLNESS BY FAMOUS AYUSH DOCTORS OF INDIA
दिनांक २७ नोव्हेंबर २०११ रोजी नाशिक येथे आयुष मेडीकल असोसिएशनने परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील नामवंत आयुर्वेदी, होमिआपथी सिद्ध युनानी डॉक्टर, योग शिक्षक, निसर्गोपचार तज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेत या क्षेत्रातील तज्ञांना येणा-या व्यावहारीक व कायदेशीर अड्चणी तसेच विकास व संशोधन समस्या यावर चर्चा होणार आहेत. तसेच दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मधुमेह, सांधेदुखी, ह्रुदयविकार, कर्कविकार इत्यादी दुर्धर विकारांवर मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
जाहिरात ही ग्राहकासाठी आहे, ग्राहकाच्या माहिती आणि गरजांच्या परिपूर्तीसाठी आहे तर त्या बद्दलची माहिती इंग्रजी बरोबरच प्रादेशिक भाषेत आणि इंटरनेटवर व्हावी आणि त्याचा फायदा तर असंख्य छोट्या व्यावसाईकांना व्हावा या हेतूने "जस्ट डिमांड" चे संचालक श्री विश्वजीत गिरीधारी यांनी http://justdemand.info या नावाचे वेब पोर्टल तयार केलेले आहे. व्यावसायिकांच्या अडचणी, मर्यादा आणि त्यांचे हित लक्षात घेतानाच अब्जावधी ग्राहकांना हव्या असणा-या वस्तू आणि सेवांच्या आणि खास करून प्रादेशिक भाषेत व्यक्त होऊ शकणा-या वैशिष्टांची दखल घेत या वेब पोर्टलची निर्मिती केलेली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ आज (बुधवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बाँब स्फोट झाला. या स्फोटात अकरा जण ठार असून चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची जवाबदारी पाकिस्तानातील हरकत - उल - जीहादी ने स्विकारली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंगसंबंधी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रख्यात आय.टी. कन्सल्टंट व ट्रेनर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांनी केले आहे. श्री झवेरी हे गेली ३५ वर्षे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून ई.आर.पी (Enterprise Resource Planning) या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आय.बी.एम. मध्ये ते १९७५ साली कार्यरत होते. हे प्रशिक्षण शिबीर रॉयल बोट क्लब बंडगार्डन रोड पुणे येथे बुधवार दिनांक २० जुलै २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळात होईल. या शिबीरामध्ये प्रो. ज्योतिंद्र झवेरी हे प्रशिक्षार्थींना ट्विटर, यू ट्युब, फेसबुक, लिंकडइन, ब्लॉग या नेटवर्किंग साईटच्या सहाय्याने मार्केटिंग कसे करावे याची माहिती देतील.
पुणे (दि.१५) रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसरच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त यंदाच्या १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार अनिरूद्ध देशपांडे (प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५० यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मांजरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात रो. डॉ. विजय मोहिते (प्रेसिडेंट), रो. नंदू जगताप (सेक्रेटरी), रो.डॉ. सचिन जाधव (प्रोजेक्ट डायरेक्टर), रो. वर्षा जांभेकर आदी मान्यवरांबरोबर गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व त्यांचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा श्री हेमंत पाटील यांनी मागे घेतला, त्यानंतर कोर्टाच्या आवारात त्यांची भेट घेऊन हस्तांदोलन केले. त्यावेळी बोलताना अण्णांनी आपआपासात भांडण्याऐवजी देशाच्या शत्रूशी लढले पाहिजे असे सांगितले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट गर्व्ह्रनरपदी रो. मोहन पालेशा यांची सन. २०११-२०१२ साठी निवड करण्यात आली. मावळते प्रांतपाल रो. प्रमोद जेजुरीकर यांच्याकडून त्यांनी सुत्रे स्विकारली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे जागतिक अध्यक्ष रो. कल्याण बॅनर्जी होते.
रोटरी क्ल्ब ऑफ पुणे अपटाऊनच्या अध्यक्षपदी रो.आनंद माडगुळकर (सुप्रसिद्ध अनुबोधपट निर्माते व गीतरामायण सादरकर्ते ) यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो. संतोष मोघे यांच्याकडून त्यांनी सुत्रे स्विकारली. सेक्रेटरीपदी रो. शिरीष लांडगे यांची निवड करण्यात आली. मावळते सेक्रेटरी रो. देवदत्त देशपांडे यांच्याकडून त्यांनी सुत्रे स्विकारली.
© 2011. Peoples Media Pune