Peoples Media Pune header

Go Back

दिलीपराज प्रकाशनाच्या २००० व्य पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि नवीन अत्याधुनिक प्रेसचे उदघाटन.

Pune 04 Jan 2012 Press Conference

 

दिलीपराज प्रकाशनाच्या २००० व्य  पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि नवीन अत्याधुनिक प्रेसचे उदघाटन.
 
दिलीपराज प्रकाशन यांच्या तर्फे पत्रकार भवन नवी पेठ, पुणे येथे दिनांक ४ जानेवारी २०१२ रोजी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये श्री राजीव बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर , दिलीपराज प्रकाशन यांच्याकडून नवीन अत्याधुनिक प्रेसच्या उदघाटना बद्दल माहिती आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्त्तरे देण्यात आली.  
 
दिलीपराज प्रकाशनचे १९९९ वे पुस्तक (साहित्य लोक, ग्रामिण आणि दलीत), २००० वे पुस्तक (स्वातंत्र्य योद्धा - मार्टिन ल्युथर किंग)  आणि २००१ वे पुस्तक ( दिल्याघरची मराठी ) यांचे प्रकाशन आणि पुणे शहरातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक प्रेस व प्रेसच्या इमारतीचे उदघाटन विरोधी पक्षनेते मा. विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून माजी गृहराज्यमंत्री मा.गजानन किर्तीकर, मा. आ. गिरीष बापट, मा. आ. भीमराव तापकीर आणि धायरीचे सरपंच मा.मदन भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. २००० व्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक मा.द.मा. मिरासदार यांच्या हस्ते होणार असून प्रा.मिलींद जोशी या पुस्तकांवर आपले विचार मांडणार आहेत.
 
’दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.’  ही संस्था महाराष्ट्रात १९७१ पासून साहित्य प्रसाराचे काम करीत असून केवळ वाड:मयीन मूल्य असलेले आजवर १९९८ ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. अनेक राज्य पुरस्कार तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत.
 
सदर उदघाटन सोहळा शनिवार दिनांक ७ जानेवारी २०१२ रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व्हे नंबर २९/८/९ धायरी इन्डस्ट्रिअल इस्टेट, पारी कंपनीच्या जवळ, पुणे येथे संपन्न होणार आहे 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite