Peoples Media Pune header

Go Back

रोटरी मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

29 Oct 2017

रोटरी क्लब ऑफ मेट्रोच्या वतीने शिक्षणास काही कारणाने मुकलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.याचा उद्देश अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व विकास महामंडळाच्याअतर्गत प्रशिक्षण देणे हा होता.यात याच लाभसुमारे ४० विद्यार्थ्यांनी घेतला हे विद्यार्थी ४ थी,८ वी,१० वी पास/नापास होते.यांना केटरिंग व्यवसाय,स्पोकन इंग्लिश,कार्यालयीन सहाय्यक,डिटीपी.टॅली, कार्यालयीन सहाय्यक,फळे-भाज्या प्रक्रिया आदीचे शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे रहाण्यास सहाय्य केले जाईल.मनोहर बँक्वेट हॉल कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी मेट्रोचे अध्यक्ष माधव तिळगुळकर,नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे,नगरसेवक जयंत भावे,रो.भावना चहुरे ,रो.मिलिंद घैसास,रो.आदिती कदम,स्पीड इन्स्टिट्यूटचे असिस्टंट जनरल मॅनेजर सुर्यकांत माडेआदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टेके सरांनी केले. 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite