Peoples Media Pune header

Go Back

परफेक्ट कोचिंग क्लासेसने पाहिल्याच दिवशी गुलाबपुष्प देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

12 Jan 2021

गेले काही महीने बंद असणारे कोचिंग क्लास आज पासून सुरू झाले. परफेक्ट कोचिंग क्लासने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व नवीन वर्षाचे कॅलेंडर देवून त्यांचे स्वागत केले. रास्ता पेठ येथील संकुलात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कोचिंग क्लास असोसिएशनच्या महिला ब्रिगेड अध्यक्ष हिना सय्यद,परफेक्ट क्लासचे संस्थापक अध्यक्ष प्रो.इरफान सय्यद,अंकिता मकासरे,मोईन खान,अदनान शेख,ओम यन्नम. आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना संबंधीचे  सर्व निर्देशांचे पालन करूनच क्लासेसची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी हिना सय्यद यांनी महाराष्ट्र सरकार व प्रशासनाचे आभार मानले.

छायाचित्र :विद्यार्थ्यांचे स्वागत करताना हिना सय्यद,इरफान सय्यद. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite