Peoples Media Pune header

Go Back

मिस,मिस्टर व मिसेस ग्लॅमर इंडिया 2020 फॅशन शो,ब्रेस्ट कॅन्सर जागृतीसाठी समर्पित.

21 Nov 2020

महिलांनाच्या ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी फोरफॉक्स प्रॉडक्शनच्या वतीने मिस,मिस्टर,व मिसेस ग्लॅमर इंडिया २०२० फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे.हा शो २० डिसेंबर रोजी हॉटेल लेमान ट्री येथे संपन्न होईल.या शोच्या मुकुट अनावरण सोहळा संपन्न झाला. हॉटेल लेमन ट्री येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी फोरफॉक्सचे माहीर करजकर,चंद्रकला सानप,अभिनेत्री श्वेता अवस्थी,चैतन्य गोखले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी माहिती देताना या स्पर्धेत रॅम्प वॉक करण्याची संधी या कर्करोगातून मुक्त झालेल्या महिलाना तसेच अन्य स्पर्धकांना मिळणार आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला एक लाख रुपये,दुसर्‍या क्रमांकाला पन्नास हजार रुपये तर दुसर्‍या उपविजेत्याला २५ हजार रुपये आणि वेब सिरिज तसेच संगीत अल्बम मध्ये काम करण्याची संधी मिळेल.तसेच यातील विजेत्या स्पर्धकांना विविध अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाईल. या स्पर्धेप्रसंगी कोरोना पासून बचावाच्या सर्व नियमावलींचे पालन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले.

छायाचित्र :मुकुट अनावरण करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite