Peoples Media Pune header

Go Back

पुणे शहर व ग्रामीण विभाग मंगलकार्यालय आणि लॉन असो.महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे डॉ.नीलम गो-हे यांना निवेदन.

19 Nov 2020

मिशन बिगिन आगेनच्या सातव्या टप्प्यात पुणे शहर व ग्रामीण विभागातील मंगल कार्यालये,हॉल,लॉन्स असोसिएशनने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांना निवेदन दिले.यात प्रामुख्याने या मंगलकार्यालये,लॉन्स,हॉल सभागृहे यांना ५०% क्षमतेने कार्यक्रम-समारंभ पार पाडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आहे. कारण १०००\२००० क्षमतेच्या सभागृहात –कार्यालयात ५० लोकांचा कार्यक्रम हा परवडू शकत नाही.तसेच अशा कार्यक्रमांना आवश्यक सेवा पुरविणार्‍या लोकांना उपासमारीची वेळ आली आहे. विजेची बिले,मालमत्ता कर इत्यादींमुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे.५०% क्षमतेने परवानगी मिळाल्यास सँनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग आदि नियमांचे आम्ही काटेकोर पालन करू असे संगितले आहे. डॉ.गो-हे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या संबंधित मंत्री- विभागाकडे पाठवून योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.सिल्व्हर रॉक पुणे. या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाचे संयोजन माजी गटनेते अशोक हरणावळ,व शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी केले.या प्रसंगी पुणे शहर ग्रामीण विभाग मंगल कार्यालय आणि लॉन असो चे अध्यक्ष श्रीपाल ओसवाल,महाराष्ट्र केटरिंग असो चे किशोर सरपोतदार,संजय वेलणकर तसेच पदाधिकारी कुणाल बेलदरे,सचिन चव्हाण,अरुण ढोबळे,विनय तटके आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :डॉ गो-हे यांना निवेदन देताना पदाधिकारी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite