Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी पुणे स्वारगेट येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

17 Nov 2020

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आहेत त्याठिकाणी राहून बाळासाहेब ठाकरेंना  अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथील बाळासाहेब कालादालन, स्वारगेट, पुणे येथे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

या दरम्यान ना.डॉ.गोऱ्हे बोलतांना म्हणाल्या की, शिवसेना प्रमुखांनी ८०%समाजकारण व २०% राजकारण अशी भुमिका मांडली होती. आता मात्र कोरोना काळात मा.मुख्यमंत्री ना.ऊद्धवसाहेब ठाकरे १००% सामाजिक भुमिकेतुन मदत कार्य करत आहेत.आजच्या शिवसेनेच्या सत्तेच्या सोपानास मा.बाळासाहेब ठाकरेंचे विचार व कार्य यातुनच चालना मिळाली आहे.

 

यावेळी पुणे शिवसेना सह-संपर्कप्रमुख प्रशांत बधे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, नगरसेवक बाळा ओसवाल, राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अमोल रासकर, सचिन देडे युवराज शिंगाडे, राजू विटकर, चंदन साळुंके, कमलेश मानकर, महिला आघाडीच्या सुषमा तळेकर, श्रुती नाझरीकर, सुरेंद्र चिकणे, अरुण पापळ, ऋषभ नानावटी, सुभाष धेंगले, सुधीर शेळके, प्रशांत लोंढे आदी शिवसैनिक उपस्थित होते.      

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite