Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब कर्वेंनगरच्या वतीने धन्वंतरी पुरस्कार आणि व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान.

14 Nov 2020

रोटरी क्लब ऑफ कर्वेनगरच्या वतीने कोरोना महामारीत रुग्ण सेवा करणारे डॉ.अरविंद कुलकर्णी,वैद्य रेणुका गायाळ,डॉ.पंकजा संपत.डॉ.दिलीप कुलकर्णी यांना धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संगणकतज्ञ दिमाख सहस्रबुद्धे यांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रांत ३१३१ चे नियोजित प्रांतपाल रो.पंकज शहा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.शाल श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.रोटरी क्लब कर्वेंनगरच्या अध्यक्षा रो.आकांक्षा पुराणिक यांनी त्याचे आयोजन केले.अंबर हॉल कर्वेंनगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जनमित्र सेवा संघाचे माऊली तुपे,सहय्यक प्रांतपाल रो.माधव तिळगूळकर,व्होकेशनल डायरेक्टर गौरी शिकारपूर,माजी अध्यक्ष शिरीष पुराणिक,माजी अध्यक्ष आशा आमोणकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित डॉक्टर्सनी जनसंसद या कोरोणा विषयक चर्चासत्राद्वारे सखोल माहिती दिली.या प्रसंगी बोलताना अध्यक्ष आकांक्षा पुराणिक यांनी अॅलोपथी,होमिओपथी व आयुर्वेद अशा तिन्ही शाखांचा सत्कार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे नमूद केले.

छायाचित्र :डावीकडून शिरीष पुराणिक,गौरी शिकारपुर दिमाख सहस्रबुद्धे,पंकज शहा,आकांक्षा पुराणिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite