Peoples Media Pune header

Go Back

डॉ.नीलम गो-हे उपसभापती विधान परिषद यांच्या प्रयत्नांमुळे येवलेवाडी,पिसोळी पुणे येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये शिवभोजन थाळी सुरू.

12 Nov 2020

येवलेवाडी ,पिसोळी पुणे येथे चार ते साडेचार हजार लोकांची कुष्ठरोग्यांची वसाहत आहे.या ठिकाणी कुष्ठरोग्यांना आवश्यक असणारी शिवभोजन थाळी सुरू करण्यासंदर्भात माजी सरपंच श्री मच्छिंद्र दगडे व सामाजिक कार्यकर्ते श्री डेव्हिड वंगार हे गेले वर्षभर प्रयत्न करत होते.कुष्ठरोग्यांना आपल्या हाताने स्वयंपाक करता येत नसल्यामुळे त्यांना तयार जेवण उपलब्ध होणे आवश्यक होते.या दरम्यान शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात डॉ.नीलम गो-हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजुन घेतल्या.त्यानुसार मुख्यमंत्री मा.ना.ऊद्धवजी ठाकरे,मा.ना.अजितराव पवार,उपमुख्यमंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ यांना शिवभोजन थाळी मंजूर करण्यासाठी सविस्तर पत्राने कळविले होते.तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी पुणे यांना यासंदर्भात निर्देश दिले होते.यानुसार येवलेवाडी पिसोळी,पुणे येथे दि ०१ नोव्हेंबर २०२० रोजीपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.यामुळे कुष्ठरोग्यांची मोठी सोय झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री डेव्हिड वांगर यांनी सविस्तर पत्र देवून श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री,श्री.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे,श्री छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व डॉ.नीलम गो-हे,उपसभापती विधान परिषद यांचे आभार मानले आहेत.याबाबत श्री डेव्हिड वंगार यांनी वरील सर्वांना लेखी पत्र पाठवले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite