Peoples Media Pune header

Go Back

घर बसल्या कॅरम स्पर्धा “ऑनलाइन लॉकडावून 2020”

10 Apr 2020

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना घरी बसण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध नाही.पण  काही कॅरम प्रेमिनी त्यावर एक उपाय शोधून काढला.अमृता कॅरम क्लब तर्फे ऑन लाइन लॉक डावून २०-२० (online lockdown 20-20)कॅरम स्पर्धा आयोजित केली.मूळ कल्पना आंतरराष्ट्रीय पंच विलास सहस्रबुद्धे यांची होती.यामध्ये प्रत्येक खेळाडूने आपआपल्या घरात एका ठराविक वेळी खेळायला सुरुवात करायची.पहिल्या whiteसोंगट्या राणीसकट घ्यायच्या आणि नंतर सगळ्या काळ्या सोंगट्या घ्यायच्या.ह्यासाठी किती टर्न लागतात ते मोजायचे,आणि तो तुमचा स्कोअर झाला. असे प्रत्येकाने 2 बोर्ड खेळायचे.ह्या सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ग्रुपवर पाठवायचे.सोमवार ते शुक्रवार दररोज 2 बोर्ड खेळायचे ,व त्या स्कोअरवर शनिवार व रविवार सेमी फायनल व फायनल होणार आहे.आज स्पर्धेचा 4 था दिवस होता.ह्या स्पर्धेत शेजवलकर,अटकेकर,कर्वे,महेश जोशी,राजेश कडू,व माधव तिळगुळकर यांनी भाग घेतला आहे.स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहस्रबुद्धे व दळवी आहेत. कॅरम ह्या खेळात अशा प्रकारची ही पहिलीच स्पर्धा आहे.  

छायाचित्र :स्पर्धक माधव तिळगुळकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite