Peoples Media Pune header

Go Back

कोरोना बधितांचे तारणहारांसाठी,सरसावले स्वामी बॅग्जच्या उपयुक्त साधन सामुग्रीचे हात.

04 Apr 2020

देशभरातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून देशातील बधितांची संख्या ३ हजार ५३ वर पोहोचली आहे,तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील बधितांची संख्या ४९० झाली असून त्यामध्ये मृतांचा आकडा २६ पर्यन्त वाढला आहे.परिणामी संसर्गाच्या या विळख्यातून वाचण्यासाठी सर्वच स्तरावर सर्वोतोपरीने दक्षता घेतली जात असतांना,सुरक्षिततेसाठी लॉक डावून,सोशल डिस्टन्सिंग,होम कोरंटाईन या व इतर शक्य त्या मार्गाचा युद्धपातळीवर अवलंब केला जातो आहे.

कोरोना बधितांचे तारणहार (डॉक्टर्स,नर्सेस,सोशल वर्कर्स)सुरक्षित तर आपण सुरक्षित-

हे झाले अबाधित व सुरक्षित समाजघटकांसाठी,परंतु वाढत्या संशयित तसेच कोरोना बाधित नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवांतर्गत काम करणार्‍या विविध हॉस्पिटल्स,सामाजिक सेवासंस्था,प्रयोगशाळांच्या माध्यमातून अहोरात्र काम करताना या कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणार्‍या संबंधित डॉक्टर्स,नर्सेस,कंपौंडर्स तसेच रिसर्च व डेव्हलपमेंट विभागात,विविध लॅब्जमधून काम करतांना मोठी जोखीम पत्करणा-या या महत्वपूर्ण समाजबांधवांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही फार मोठी आहे. ते सुरक्षित राहतील तर आपण सुरक्षित राहणार आहोत.या जाणिवेतून आणि तेव्हड्याच तत्परतेने स्वामी बॅग्ज उद्योग समूहाने या समाजबांधवांसाठी ,त्यांच्या आरोग्यहितार्थ तत्परतेने पाऊल उचलले आहे.

सुरक्षित जंप सुट्स,गाऊन्स,अॅप्रन्स,नॉनपेरिएबल सुट्स,कॅप्स उत्पादनांची युद्धपातळीवर निर्मिती-

वास्तविक पाहता कोरोना जेव्हा आगदीच प्राथमिक स्वरुपात पुण्यात प्रवेश  करीत होता,तेव्हाच स्वामी बॅग्जच्या वतीने पुण्याचे ग्रामदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाला प्रार्थना करून २५०० हून अधिक मास्कचे मोफत वाटप केले होते.त्यानंतर दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाचा संसर्ग आणि त्याला रोखण्यासाठी व भविष्यातील धोका लक्षात घेवून अत्यावश्यक सेवांतर्गत काम करणार्‍या डॉक्टर्स,नर्सेस,कंपाउंडर्स,तसेच रिसर्च व डेव्हलपर्स यांच्या सुक्षेचा मुद्दा विचारात घेवून त्यांच्यासाठी संपूर्णत: सेफ आणि सिक्युअर्ड जंप सुट्स,गाऊन्स,अॅप्रन्स नॉनपेरिएबल सुट्स,कॅप्स इ.अत्यावश्यक साहित्य सामुग्री प्रायोगिक स्तरावर बनवायला घेतल्या आहेत.ज्यासाठी संबंधित लॅब्ज व सायंटिफिक तज्ञ मंडळींचे योग्य मार्गदर्शन आणि सल्ला घेण्यात आला आहे.

मान्यवर हॉस्पिटल्स,क्लिनिक्स व लॅबोरेटरीज व सामाजिक सेवाभावी संस्थांची वाढती मागणी –       

बिनधोक वापरावेत आणावेत  आशा दर्जा –गुणवत्ता आणि मटेरियल्सची खबरदारी घेवून बनविण्यात येत असलेल्या स्वामी बॅग्जच्या या दर्जेदार व शास्त्रीय दृस्त्या परिपूर्ण साधन सामुग्रीला आज संबंधित सर्वच अत्यावश्यक सेवांतर्गत काम करणार्‍या माध्यमातून मोठी मागणी होत आहे.यामध्ये विश्वराज हॉस्पिटल (लोणी),श्रीमती काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल्स आणि अनेक खाजगी सामाजिक सेवा संस्थांसाठी स्वामी बॅग्जने आपल्या या उत्पादनांचा युद्धपातळीवर पुरवठा केला आहे.तसेच यासंदर्भात यावेळी बोलताना स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप यांनी संगितले की अनेक शहर तसेच ग्रामीण हॉस्पिटल्स,लॅब्ज,व संबंधित कर्मचार्‍यांसाठी अत्यावश्यक सेवेअंतर्गत जंप सुट्स,गाऊन्स,अॅप्रन्स नॉनपेरिएबल सुट्स,कॅप्स आदींचा मागणीनुसार तत्परतेने पुरवठा करण्यासाठी आपण कटीबद्ध असून दर्जा-गुणवत्तासंपन्न मटेरियल्ससाठी सर्वांगाने सक्षम आहोत. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite