Peoples Media Pune header

Go Back

आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर समुपदेशकाची गरज भासतेच-डॉ.प्रशांत खांडे.

14 Mar 2020

मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला हा प्रश्न बर्‍याचदा चर्चेत येतो.खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज भासतेच.समुपदेशन त्या प्रत्येकासाठी जो भावनिक व शारीरिक समस्यांना सामोरा जात आहे.ज्या समस्यांच त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे.या सर्व घटकांचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आणि सक्षम समाज निर्मितीसाठी नेहमीच पुढाकार घेणारे डॉ.प्रशांत खाडे यांच्या संकल्पनेतून स्पार्टबन सोसिअल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी सकाळी १० ते ५ या वेळेत “मोफत समुपदेशन केंद्र” श्री वेंकटेश,दूसरा मजला,झील कॉलेज चौक,न-हे,धायरी रोड.न-हे ४११०४१ येथे सुरू करण्यात आले आहे.लोकांची गरज लक्षात घेता याचा कालावधी वाढविण्यात येणार आहे.केंद्राचे उद्घाटन फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रशांत खांडे यांच्या हस्ते १४ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता झाले.समुपदेशक म्हणणं हेमा जगताप आणि गौरी ओर्पे यांची निवाड त्यांचा दांडगा अनुभव बघून करण्यात आली आहे.त्यांच्या सोबत मुलाखतीची वेळ ठरविण्या करीता मो.७७५८०९५४९ या नंबरवर फोन करून सर्व पुणे वासीयांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी संस्थेतर्फे राघव भागवत,सुनील मोरे,मयूर बागूल,सतीश देशमुख,प्रशांत कुमार,हनुमंत नावंदर,आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी किंवा फेडरेशनचे सदस्य बनण्यासाथी संस्थेशी ८४४६७६३९९९/९८५०९१९५६७ या नंबर वर संपर्क साधता येईल असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite