Peoples Media Pune header

Go Back

रोटरीच्या वतीने स्वारगेट बसस्थानक येथे ८००बालकांचे पोलिओ लसीकारण

19 Jan 2020

रोटरी क्लब लोकमान्यनगर,रोटरी क्लब शनिवारवाडा,रोटरी क्लब हिलसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट येथील एसटी बस स्थानकावर ८०० बालकांचे पोलिओ लसीकरण संपन्न झाले. या प्रसंगी रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्ष रो.टिना रात्रा,रोटरी क्लब शनिवारवाडाच्या अध्यक्ष रो.अनिता पाटील,रोटरी क्लब हिलसाईडचे अध्यक्ष उमेश नाईक,प्रांत पोलिओ डायरेक्टर रो.अॅड अजय वाघ,वॉटर डायरेक्टर मीनाताई बोराटे,रो वासवी मुळे,रो.प्रदीप गिरी,रो.प्रभाकर पंडित,रो.विलास रवांदे,रो.अभय जबडे,रो.महेश घोरपडे आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते.सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असे रो.अजय वाघ प्रांत पोलिओ डायरेक्टर यांनी नमूद केले.

छायाचित्र :स्वारगेट येथे बालकांना लस देताना रोटरी सदस्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite