Peoples Media Pune header

Go Back

हैदराबाद निर्भया कांड बाबत महिलांचा मेणबत्ती मोर्चाने निषेध.

05 Dec 2019

हैद्राबाद येथिल निर्भया बलात्कार व जळीत कांड,व देशातील अशा गुन्ह्यांच्या निषेधात पुण्यातील महिलांच्या वतीने मेणबत्ती मोर्चाने निषेध करण्यात आला.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराजवळील भिडे शाळेसमोर याची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी आयोजक नगरसेविका आरतीताई सचिन कोंढरे,महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा महिला उपाध्यक्षा स्वरदाताई बापट-केळकर,पुणे मनपा स्थायी समिति अध्यक्ष हेमंत रासने,समिति अध्यक्ष वैशालीताई नाईक,उमेशअण्णा चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते),आशाताई शिंदे,राधाताई काची,मारटकरताई,आदि मान्यवरांच्या बरोबरच महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.त्यांनी काळी पट्टी हातावर बांधली होती,व मेणबत्ती पेटवून आदरांजली वाहिली.यानंतर मोर्चा मंडई मार्गे फुलवाला चौक,कस्तुरे चौक मार्गे महात्मा फुले वाडा गांजपेठ येथे विसर्जित झाला.या प्रसंगी बोलताना स्वरदा बापट व आरतीताई कोंढरे यांनी अशा घटना दुर्दैवी असून जनजागृती बरोबरह गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून शिक्षेची त्वरित आंलबजावणी व्हावी अशी अपेक्षा विकत केली.

छायाचित्र :आदरांजली वाहताना आरतीताई सचिन कोंढरे,स्वरदाताई बापट-केळकर,हेमंत रासने,व महिलावर्ग 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite