Peoples Media Pune header

Go Back

जागतिक एड्स दिनानिमित्त “हॅविंग व्हर्जिनिटी पॉझिटिव्ह”,शॉर्टफिल्मची निर्मिती.

02 Dec 2019

डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि कुसुम वत्सल फाउंडेशनच्या वतीने “हॅविंग व्हर्जिनिटी पॉझिटिव्ह”(Having virginity Positive)या नावाने लघुपटची निर्मिती करण्यात आली आहे.त्याचे प्रकाशन लोकमान्य प्रभू ज्ञान मंदिर,नवी पेठ येथील सभागृहात करण्यात आले या प्रसंगी निर्माते डॉ.राजेंद्र भवाळकर,डॉ.मिलिंद भोई(सामाजिक कार्यकर्ते),डॉ.भीम गायकवाड(प्रिन्सिपल अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय),पोलिस उपायुक्त धनंजय धोपवकर,शिरीष मोहिते.चित्रपट निर्माते होनराव,भानूदास पायगुडे(सामाजिक कार्यकर्ते),हेमा फडतरे,मयूरसिंग परदेशी(दिग्दर्शक),राजश्री आपटे(लेखक),नेहा फडतरे,वैशाली पाटील,सिनेअभिनेत्री सोनल गोडबोले आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तविक डॉ.राजेंद्र भवाळकर आणि योगेश नाईक यांनी केले.सूत्रसंचालन शीतल कारंजे आणि सारिका अगज्ञान यांनी केले.वैशाली पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. 

    या लघुचित्रपटात एक कुमारी युवती  अन्य कारणाने एड्स बाधित होते व तिला मैत्रीनी अ समाजाकडून वेगळी वागणूक मिळते.मात्र हा विकार कोणत्या कारणांनी होतो,बाधित व्यक्तिला शारीरिक,मानसिक आधार कसा हवा.समाजाचा या व्यक्तींविषयी दृष्टीकोण कसा बादलला पाहिजे याचे चित्रीकरण या लघुचित्रपटात आहे.

छायाचित्र :मान्यवर व कलाकार तंत्रज्ञ यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite