Peoples Media Pune header

Go Back

उद्योग दिंडीच्या यशाबद्दल सॅटर्डे क्लब कोथरूड सदस्यांचा सत्कार.

28 Nov 2019

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “उद्योग दिंडी”,च्या यशस्वी कार्यक्रमात काम केलेल्या सॅटर्डे क्लब कोथरूड चॅप्टर सदस्यांचा सत्कार डेप्युटी रिजनल सेक्रेटरी सुहास फडणीस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला.याप्रसंगी सॅटर्डे क्लब कोथरूड चॅप्टर अध्यक्ष विनायक देशपांडे,खजिनदार केतन पाटील,प्रसाद कात्रे आदि मान्यवर व सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना विनायक देशपांडे यांनी हॉटेल जे ड्ब्ल्यु मेरीएट येथे झालेल्या उद्योग दिंडी कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुमारे ७५० उद्योजक सकाळी ८ ते संध्याकाळी ६ असे पूर्णवे उपस्थित राहणे व परस्पर उद्योगांना मदत व मार्गदर्शन असा उपक्रम अद्वितीय होता असे संगितले.

छायाचित्र :सत्कारीत सदस्य यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite