Peoples Media Pune header

Go Back

“मूल्याधारीत भांडवलवृद्धी,सचोटी व परस्पर सहकार्य यामुळेच उद्योगात यश मिळते”.-अशोक दुगाडे.

18 Nov 2019

मूल्याधारीत भांडवलवृद्धी,सचोटी व परस्परांत सहकार्य यामुळेच उद्योगात यश मिळते.तसेच व्यवसायिकांनी फक्त व्यावसायिक संबंध न जोडता वैयक्तिक स्नेह सुद्धा निर्माण करावा’.असे प्रतिपादन अशोक दुगाडे(सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट चेअरमन) यांनी केले.सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने आयोजित “उद्योग दिंडी”या कार्यक्रमात ते बोलत होते.हॉटेल जे.डब्ल्यु मेरीयट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सोनई मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन दशरथ माने,रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रो.रवी धोत्रे,पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक  अध्यक्ष आनंद देशपांडे,माधवबागचे रोहित साने,नरेंद्र बगाडे(सॅटर्डे क्लब कोअर कमिटी),रूरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे,पुणे रिजनचे रिजनल सेक्रेटरी अभिजीत फडणीस डेप्युटी रिजनल सेक्रेटरी सुहास फडणीस व स्वप्नील कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील ७५० उद्योजक उपस्थित होते.यावेळी विविध यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वर्णेकर यांनी केले.  

छायाचित्र :डावीकडून सुहास फडणीस,नरेंद्र बगाडे,अभिजीत फडणीस,अशोक दुगाडे,आनंद देशपांडे,रवी धोत्रे,दशरथ माने. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite