Peoples Media Pune header

Go Back

मासिक पाळी,स्वच्छता,आरोग्य व पर्यावरण रक्षण याविषयी रोटरीच्या वतीने रो.डॉ.आमिषा मेहता(वापी-गुजरात)यांचे व्याख्यान संपन्न.

16 Nov 2019

मासिक पाळी,स्वच्छता,आरोग्य,आणि पर्यावरण रक्षण तसेच पुनर्वापरास योग्य सॅनिटरी नॅपकिन्स याची माहिती व जनजागृती यासाठी रोटरी क्लब कर्वेनगर व अन्य ११ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रो.डॉ.आमिषा पटेल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मराठा चेंबर्सच्या टिळकरोड येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.रश्मि कुलकर्णी,रोटरीच्या विंग्ज डायरेक्टर रो.अर्चना टोपले.रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्ष रो.आशा अमोणकर,सेक्रेटरी रो.आकांक्षा पुराणिक आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध रोटरी क्लब पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना रो.डॉ. आमिषा मेहता यांनी मासिक पाळी व सॅनिटरी नॅपकिन्स याविषयी समाजात बरेच समज गैरसमज आहेत.मात्र योग्य ती माहिती परस्पर संवाद व रसायनिक वापराचे सॅनिटरी नॅपकिन्स ऐवजी पुनर्वापरास योग्य सॅनिटरी नॅपकिन्स यांचा प्रसार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :आमिषा मेहता,रश्मि कुलकर्णी,अर्चना टोपले व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite