Peoples Media Pune header

Go Back

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संस्थेच्या वतीने GST(वस्तु व सेवा कर)विषयक कार्यशाळेचे आयोजन

14 Nov 2019

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संस्थेच्या वतीने GSTवस्तु व सेवाकर विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार दिनांक १ डिसेंबर २०१९ ते शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२० या कलावधीत दर शनिवार रविवार सकाळी ९ ते १ या वेळेत आयोजित केली आहे.यामध्ये करसल्लागार,त्यांचे सहाय्यक,वाणिज्य व कायदा शाखेचे विद्यार्थी तसेच अकौंटंट,गृहिणी व या कायद्याचे ज्ञान हवे आहे आशांसाठी ही उपयुक्त आहे.संबंधित विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान,मोफत सल्ला,व अद्यावत पुस्तिका दिली जाईल.असे पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संस्थेचे अध्यक्ष शरद सूर्यवंशी,चेअरमन वृंदावन शहा,व स्वप्नील शहा यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.संपर्क – vgs.office@yahoo.in   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite