Peoples Media Pune header

Go Back

“उद्योग दिंडी”चे सॅटर्डे क्लब पुणे रिजन तर्फे आयोजन.

07 Nov 2019

सॅटर्डे क्लब पुणे यांचेतर्फे  सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी जे ड्ब्ल्यु मेरीयट हॉटेल,सेनापती बापट रोड येथे महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी उद्योग दिंडीचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा.श्री.नितिनजी गडकरी यांच्या हस्ते तसेच सोनई मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन श्री.दशरथ माने व रोटरी इंटरनॅशनल ३१३१चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(प्रांतपाल)रो.रवी धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

     या कार्यक्रमात विको लॅबोरेटरीचे चेअरमन श्री.पेंढारकर,पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष अनंत देशपांडे,व सेंट अॅंजेलोजचे अॅंजेलो राजेश हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच विविध उपक्रमांमधून माधवबागचे रोहित साने,रूरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे,रुद्र एन्वेरीमेंटलच्या मेघा ताडपत्रीकर,जनरीकार्टचे कोल्हटकर,एमडी डिस्प्रोट्रोनिक्सचे योगेश गुजर,अनुरूप विवाहसंस्थेच्या गौरी काटकर,गौरी फुड्सचे अनिकेत खालकर,गायकवाड टूर्सचे कॅप्टन निलेश गायकवाड आपली यशोगाथा उपस्थितांसमोर उलगडणार आहेत.कार्यक्रमाच्या संगतेला लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओमप्रकाश पेठे व जयवंत इंटरनॅशनल स्कूलचे डॉ. विनोद बाबर हे मार्गदर्शन करतील.

    सॅटर्डे क्लब ही महाराष्ट्रीय उद्योजकांसाठीच ग्राहक संपर्क मिळवून देणारी एकमेव सेवाभावी संस्था ब्रिज इंजिनियर कै.माधवराव भिडे यांनी २००० साली मुंबई येथे स्थापन केली.मराठी उद्योगांना व उद्योजकांच्या व्यवसायिक मानसिकता वाढीला उत्तेजन देणे,नवीन उद्योग उभारणीला चालना देणे,विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योगाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे,व्यवसायिक अडचणीमधून मार्ग काढण्यास मार्गदर्शन करणे व व्यवसाय वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होण्याकरिता अनेक व्यवसायिकांचे व्यावसायिक जाले विणून त्यातून पुन्हा नवीन संधी निर्माण करून देणे आदि उद्दीष्ट्रांवर आधारित काम या संस्थेमार्फत चालते. आजवर संस्थेच्या ४३ च्या वर शाखा असून एकट्या पुणे रिजन मध्ये 8 चॅप्टर व 300 सभासदांमधून ५५ कोटींपेक्षा जास्त व्यावसायिक उलाढाल आजवर झाली आहे.या संस्थेला विद्यमान अध्यक्ष अशोक दुगाडे,संचालक विनकोटचे प्रदीप ताम्हाणे,पितांबरीचे प्रभूदेसाई,निर्माण ग्रुपचे मराठे,हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे,सीमेन्स इंडियाचे माजी उपाध्यक्ष परांजपे,कोअर कमिटीचे नरेंद्र बागाडे,मांजरेकर,फाळके,विनीत बनसोडे,अतुल अत्रे,यांचे मार्गदर्शन कायम लाभते.संस्थेचे रिजनल सेक्रेटरी अभिजीत फडणीस,डेप्युटी रिजनल सेक्रेटरी सुहास फडणीस,व स्वप्नील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतलेला आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite