रोटरी क्लब पुणे हिलसाईडच्यावतीने रोटरी प्रांत ३१३१ चा दिवाळी अंक “रोटरी दीप” दिवाळी अंकाचे प्रकाशन भरत नाटय मांदिर येथे नुकतेच करण्यात आले.या प्रसंगी लेखक अभिराम भडकमकर,रोटरी प्रांत 3131चे प्रांतपाल रो.रवी धोत्रे,डिस्ट्रिक्ट कल्चरल इव्हेंटचे रो.संजय डोळे,सतिश सातारकर,रोटरी क्लब हिलसाईडचे अध्यक्ष उमेश नाईक,सेक्रेटरी अभय जबडे,सूत्र संचालक पुजा गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. या अंकात रोटेरियन व रोटरी सदस्य नसलेल्या लोकांचे लेख,कविता,कथा,व सुमारे ३० रोटरी क्लबच्या सेवा कार्याची माहीती आहे.या अंकाचे वाटप मोफत आहे.ज्यांना हा अंक हवा आहे त्यांनी 8600146778 नंबर वर व्हाट्सअपने मागणी करावी.
छायाचित्र : रोटरी दीपचे प्रकाशन करतांना मान्यवर
© 2011. Peoples Media Pune