Peoples Media Pune header

Go Back

रोटरी हिलसाईड व नेहा तेंडुलकर यांनी केली वाहतूक जनजागृती.

30 Oct 2019

दीपावलीच्या नरकचतुर्दशीच्या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईडने महालक्ष्मी मंदिर,सारसबाग येथील सिग्नलला “वाहतूक जनजागृती”(Traffic Awarness)च उपक्रम राबविला.सुप्रसिद्ध चित्रकार स्व.मंगेश तेंडुलकरांनी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या कन्या नेहा तेंडुलकर या अतिशय जिद्दीने पुढे नेत आहेत.आणि दरवर्षी यात खारीचा वाटा रोटरी क्लब हिलसाईडने उचलला आहे.या प्रसंगी नेहा तेंडुलकर,रोटरी क्लब हिलसाईडचे अध्यक्ष रो. उमेश नाईक,सेक्रेटरी अभय जबडे,पूजा गिरी,अदिती पाटे,पब्लिक इमेज डायरेक्टर पळशीकर आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते.

छायाचित्र :नेहा तेंडुलकर,उमेश नाईक व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite