Peoples Media Pune header

Go Back

बडोदे मित्रमंडळाच्या हिरक महोत्सवाचे राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांच्या हस्ते २४ ऑक्टोबर रोजी उद्घाटन.

15 Oct 2019

बडोदे मित्रमंडळ यंदा हिरकमहोत्सव साजरा करीत आहे.२४ ऑक्टोबर रोजी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या राजमाता शुभांगीराजे गायकवाड(लक्ष्मी विलास पॅलेस वडोदरा) यांच्या हस्ते उद्घाटन होईल.या प्रसंगी गुरुजी डॉ.बालाजी तांबे आणि त्यांचे सहकारी “आत्म संतुलन जीवन संगीत” हा आध्यात्मिक व संगीतातून आत्मिक आरोग्य हा कार्यक्रम सादर करणार आहेत.ज्यात मन व शरीर यांचा समावेश असेल.स्व.गंगूताई पटवर्धन स्मृति व्याख्यान मालेतील व्याख्यान विवेक सावंत(एमडी नॉलेज कार्पोरेशन लि.) हे “शिक्षण व नोकर्‍या यांचे भवितव्य” सादर करतील.हा कार्यक्रम एमईएस ऑडिटोरियम,मयूर कॉलनी कोथरूड येथे सकाळी ८.३० ते दुपारी ४.०० या वेळात संपन्न होईल.  

     बडोदेमित्रमंडळाची स्थापना २५ ऑक्टोबर १९५९ वर्षी झाली.संस्थापक स्व.गांगुताई पटवर्धन(समाजसुधारक व शिक्षणतज्ञ)व त्यांचे सहकारी जे बडोदे संस्थानात श्रीमंत महाराजा सायाजीराव गायकवाड साहेब यांच्या संस्थानात कार्यरत होते व नंतर पुण्यात स्थायिक झाले असे नागरिक यांनी स्थापनेत सहभाग घेतला. सध्या सुमारे ३५० सदस्य याचे पुण्यात आजीवन सदस्य आहेत.जे पुण्यात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.या समारंभात डॉ.विजय भटकर,आयटी क्षेत्रांतील दिग्गज,शिक्षण क्षेत्रांतील व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाङगीळ करणार आहेत.अशी माहिती राजेंद्र माहुलकर,संजय दिवाणजी,अश्विन जोशी,किर्ति नागरेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.     

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite