Peoples Media Pune header

Go Back

दिवाळी निमित्त घरगुती व हाताने बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन १८ ते २० ऑक्टोबर रोजी

09 Oct 2019

 दिवाळी मध्ये विविध वस्तूंची आवश्यकता असते.अशा वस्तु एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात.तसेच या वस्तु हाताने बनविणार्‍या लोकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी शो टाईम संस्थेच्या वतीने शुक्रवार  दिनांक १८ ऑक्टोबर ते रविवार दिनांक २० ऑक्टोबर पर्यन्त अशा वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे.स्थळ पौड रोड येथील उत्सव मंगल कार्यालय.वेळ सकाळी १० ते रात्री ९. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा व त्याचे व्यवसायात रूपांतर व्हावे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या प्रदर्शनात विविध प्रकारचे खादय पदार्थ,दागिने,कपडे,दिवाळीनिमित्त लागणारी विविध प्रकारची साधने व इतर अनेक गोष्टींचे २७ स्टॉल्स आहेत.तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात अनेक मान्यवर व विविध क्षेत्रांतील मान्यवर भेट देणार आहेत.प्रवेश विनामुल्य आहे. तरी नागरिकानी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आयोजक मोनिश डबीर,व शंतनू पोंक्षे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी https://www.facebook.com/SHOW-TIME-103975030972099/

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite