Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर सेंट्रलच्या वतीने स्वातंत्र्यदिना निमित्त रक्तदान शिबीर

16 Aug 2019

७३ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल व एसएम जोशी कॉलेज हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एसएमजोशी कॉलेज येथे झालेल्या या शिबिरात १५२ जणांनी रक्तदान केले.या प्रसंगी रोटरी क्लब हडपसर सेंट्रलचे अध्यक्ष महेंद्र लुणिया,सेक्रेटरी मेहुल चिमठणकर,रो.वामन भुरे,रयत शिक्षण संस्थेचे जनरलबॉडी सदस्य दिलीप आबा तुपे,प्राचार्य डॉ.अरविन्द बुरुंगले,झेड प्लस हॉस्पिटलचे डॉ.राहुल झंजुर्ने,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर,सचिन तुपे संपत खोमणे,आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.शिबिराचे तांत्रिक संचालन रेड प्लस रक्तपेढीने केले.

छायाचित्र :रक्तदान करताना विद्यार्थी,व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite