Peoples Media Pune header

Go Back

सहल आयोजकांच्या मोफत प्रदर्शनाचे मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते उद्घाटन.

16 Aug 2019

उज्ज्वल विकास फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.कोहिनूर मंगल कार्यालय टिळकरोड.येथे झालेल्या या उद्घाटन समारंभ प्रसंगी उज्ज्वल विकास फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल चिलवंत,कॅप्टन निलेश गायकवाड,जीवन हेंद्रे,विश्वास केळकर,संतोष खवले आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी पर्यटन हे आता मोठ्या संखेने होत आहे.ती सध्याची एक गरज बनली आहे.सहल आयोजकांनी उत्तम सेवा देवून ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करावे असे संगितले.या प्रदर्शनात ४० हून अधिक सहल आयोजकांनी सहभाग घेतला असून शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट ते रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वांना मोफत खुले आहे.   

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मुक्ताताई टिळक,अमोल चिलवंत,निलेश गायकवड,विश्वास व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite