Peoples Media Pune header

Go Back

राष्ट्रीय बहुजन विकास विकास महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

12 Aug 2019

राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचा वर्धापन दिन व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंतीचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.त्या प्रसंगी प्रथम सांगली,कोल्हापूर,सातारा,येथील पुरात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब भांडे,गणेश कवडे(शिवसेना जिल्हा अध्यक्ष/ओझर गणपती ट्रस्ट अध्यक्ष),यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. पुरस्कार मूर्ति पुढील प्रमाणे साहित्यिक /दिग्दर्शक पुरस्कार सुरेश पाटोळे,उद्योजक पुरस्कार गणेश कवडे,सामाजिक पुरस्कार संजय चव्हाण,सामाजिक पुरस्कार,पत्रकारिता पुरस्कार मंगेश पाटे. या कार्यक्रमाचे आयोजन केरबा पाटील फाउंडेशन  रिसर्चने केले.शाल,श्रीफल,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 नारायणगाव येथील केरबा पाटील फाउंडेशन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब भांडे(संघटना अध्यक्ष),रामदास साळवे,अनंत वैराट,पांडुरंग नेटके,नारसुडे सर,नाथा कसबे,अमित आल्हाट,दादाभाऊ आल्हाट,अनिल खुडे,मुरलीधर आल्हाट,खेड,आंबेगाव,जुन्नर या तालुक्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले,कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष भाषण काशीनाथ आल्हाट यांनी केले आणि आभार प्रदर्शन अनिल शिंदे यांनी केले.    

छायाचित्र :डावीकडून सुरेश पाटोळे,अनंत वैराट,गणेश कवडे,नारायण आरोटे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite