Peoples Media Pune header

Go Back

सॅटर्डे क्लबच्या उद्योगदिंडीचे अशोक दुगाडे व प्रज्ञा गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन

06 Aug 2019

स्व.माधवराव भिडे(ब्रिज इंजिनियर)यांनी निर्माण केलेल्या मराठी उद्योजकांच्या सॅटर्डे क्लबच्या उद्योगदिंडीचे उद्घाटन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेयरमन-मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे व दे आसरा फाउंडेशनच्या सीईओ प्रज्ञा गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.पार्सिसटंट सिस्टिम्स सभागृह सेनापति बापटरस्ता येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रिजनल सेक्रेटरी अभिजीत फडणीस,डे रिजनल सेक्रेटरी सुहास फडणीस,स्वप्नील कुलकर्णी,प्रदीप मांजरेकर आदि मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,सदस्य व विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते.या कार्यक्रमात जयंत अभ्यंकर(शारंगधर फार्मा),नवनाथ येवले(येवले चहा),मंदार जोगळेकर(बुकगंगा) यांची प्रकट मुलाखत वैशाली वर्णेकर यांनी घेतली.  

छायाचित्र :उद्योगदिंडीचे उद्घाटन करताना अशोक दुगाडे,प्रज्ञा गोडबोले व अन्य.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite