Peoples Media Pune header

Go Back

भारतीय मराठा देशमुख मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

06 Aug 2019

भारतीय मराठा देशमुख मंडळाच्या वतीने १०/१२ वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिंनिंचा सत्कार करण्यात आला.गुलाबपुष्प व प्रमाणपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. श्री छत्रपती राजाराम सभागृह,बिबवेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सचिव ज्ञानेश्वर पासलकर,खजिनदार विष्णुपंत पासलकर,सहसचिव जगदीश जेधे,महिला अध्यक्षा पद्मजा देशमुख,महिला खजिनदार अनुराधा पासलकर,यशदा संचालिका हेमाताई निंबाळकर,शिक्षण तज्ञ दिगंबर देशमुख आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना हेमाताई निंबाळकर यांनी परीक्षेत मार्क तर महत्वाचे आहेतच मात्र तो विषय आपल्याला किती समजला व त्याचा व्यावहारिक वापर समजणे महत्वाचे आहे.व या यशाबरोबरच उत्तम नागरिक बनावे असे संगितले.  

छायाचित्र :मान्यवर व विद्यार्थी यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite