Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी शलाका भालेराव.

17 Jul 2019

रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.शलाका भालेराव यांनी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.गिरीश देशपांडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी पूनम चौधरी यांची निवड करण्यात आली.अस्मिता वैदय यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.खजिनदारपदी मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.अंब्रेशिया रिसॉर्ट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी,विणा आखवे,शालिनी भालेराव आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य,व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रश्मी कुलकर्णी यांनी समाजाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपले सेवा कार्याचे नियोजन करावे असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष रो.शलाका भालेराव यांनी आगामी काळात शिक्षण,पर्यावरण,रोजगार,वैद्यकीय सेवा,इत्यादि क्षेत्रांत विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.  

छायाचित्र :शलाका भालेराव  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite