Peoples Media Pune header

Go Back

२१ ते २३ जून “मनस २” चित्रप्रदर्शनाचे आयोजन.

11 Jun 2019

क्रिएटीव्ह मास आर्ट हाऊस संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक २१ जून ते रविवार दिनांक २३ जून पर्यन्त “मनस २” या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.२१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता याचे उद्घाटन होईल.राजा रविवर्मा आर्ट गॅलेरी,घोलेरोड येथील या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारत,नेपाळ,बंगलादेशातील ४० कलाकारांच्या ८० कलाकृती असतील.यात लँडस्केप,रिअलीस्टिक,अॅबस्ट्राक्ट प्रकारात वॉटर कलर,अॅक्रेलिक,ऑइल या माध्यमांच्या कलाकृतींचा समावेश आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.असे वत्सला पांडे संस्थापक अध्यक्ष क्रिएटीव्ह मास आर्ट हाऊस यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite